एपीएमसी बद्दल

समितीची रचना व कार्य (स्थापना)

शेतमाल विक्रीकरीता सुसज्य बाजार आवाराची निर्मिती करणे व बाजार व्यवस्थेत असणाऱ्या अनिष्ठ प्रथेचे निमुर्लन करणे व आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना शेतमालाची वाजवी किंमत त्यांना मिळवून देण्याकरीता समितीची रचना उपविधी २(४) यात नमूद असून, सदर बाजार समितीची स्थापना .अ‍ॅन्ड बेरार अ‍ॅक्ट १९३२ चे तरतुदी नुसार दि.११ऑगस्ट १९४२ ला स्थापना झाली आहे. महाराष्ट्र कृषी पणन (विकास व विनियमन) १९६३ अंतर्गत संस्थेच्या पोटनियमास मंजूरी देण्यातआली. संस्थेची सुधारीत उपविधी दि.२७.०४.२०११ रोजी मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यांचे कार्यालयाकडून मंजूरी प्राप्त झालेली आहे.

समितीच्या मुख्य कार्यालयाचा नोंदणीकृत पत्ता मेन रोड, सिंदी (रेल्वे) ता. सेलू जि. वर्धा असून उपबाजार सेलू येथे आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार समितीचे सदस्य खालील गटाचे प्रतिनिधित्व करतात.

महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (नियमन) अधिनियम १९६३ चे कलम ९३ अंतर्गत खालील सदस्यांची समिती अस्तित्वात होती.

अ.क्र. सदस्य तपशिल सदस्य संख्या
शेतकरी प्रतिनीधी (सेवा सहकारी संस्था)/- ११
शेतकरी प्रतिनिधी (ग्राम पंचायत)/- ०४
अनुज्ञप्ती धारक व्यापारी प्रतिनीधी/- ०२
हमाल प्रतिनीधी ०१
पंचायत समिती प्रतिनिधी ००
स्थानीक प्रशासन / नगरपालीका प्रतिनिधी ००
शासन नियुक्त तज्ञ संचालक ००
शासन नियुक्ती प्रतिनीधी ०१
प्रक्रिया पणन सहकारी संस्था संघ ००

सदर संचालक मंडळाची निवडणूक दि.२८.०४.२०२३ ला झाली असुन दि.१५.०५.२०२३ पासुन पदभासर स्विकारला असुन संचालक मंडळाचा कालावधी दिनांक १४.०५.२०२८ पर्यत आहे .

सभापती :- श्री. केशरीचंद बालारामजी खंगारे १५/०५/२०२३ पासून
उपसभापती :- श्री. प्रमोद वामनराव आदमणे १५/०५/२०२३ पासून
सचिव :- श्री.महेंद्र रजनी अशोकराव भांडारकर १५/०३/२००७ पासुन

शासन निर्णय १३ जुन २०१७ नुसार बाजार समिती संचालक मधिल सदर आदेशाच्या दिनांकापासुन नगरपालीका, पंचायत समिती आणि प्रक्रीया मतदार संघाचा प्रतिनिधी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळात समाविष्ट असण्याची तरतुद रद्द झालेली आहे.

समितीने उपबाजाराच्या विकासा बरोबरच मुख्य बाजाराचा विकास होईल याबाबत प्रयत्न करावे तसेच शेतकऱ्यांना योग्य हमी भाव मिळेल याबाबत दक्षता घ्यावी. तसेच बाजार विकासा करीता शासन स्तरावरून सहाय्य प्राप्त होणे संबधाने आवश्यक प्रस्ताव सादर करून बाजार समितीचा विकास घडवून आणावा

उद्देश व कार्यपध्दती

कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री नियमन कलम २(३) मधील निर्देशित मालाची खुल्या भावाने विक्री करून शेती उत्पादित मालाची योग्य किंमत मिळवून देण्याचे तसेच खरेदी विक्री व्यवहारातील होणाऱ्या गैरप्रकारात आळा घालण्याचे दृष्टीने समिती प्रस्तापित झालेली असून, कलम २९(ब)(ड) अन्वये जंगम व स्थावर मालमत्ता प्रस्थापनेसाठी विविध बांधकाम करणे व बाजार क्षेत्राचा विकास करणे हा समितीचा प्रमूख उद्देश आहे. तसेच शेतकऱ्यांचा माल साठवून ठेवण्याकरीता गोडावूनची निर्मीती करणे व मालाची देखरेख करणे. तसेच कायदा नियम व उपविधीतील तरतूदीनुसार मुख्य बाजार यार्डची निर्मीती करून लिलाव करणे.

कार्यक्षेत्र

बाजार समितीचे कार्यक्षेत्र सेलू तालुक्यातील सर्व खेडी असे एकूण १७२ गावापुरते मर्यादीत असून यात १ नगर परिषद, १ नगर पंचायत, ६३ ग्राम पंचायती व ३७ सेवा सहकारी संस्थांचा समावेश आहे.