इलेक्ट्रॉनिक्स / ऑनलाइन मीडिया

बाजार समितीच्या सेलू येथील उपबाजारपेठेच्या सभागृहात शेतकरी, व्यापारी व गिरणी मालकांसाठी जागरूकता अभियान

  • पब्लिक
  • An awareness campaign for farmers, traders, and mill owners was held in the hall of the market committee's sub-market in Selu.

गोदामांमध्ये ठेवलेला माल सुरक्षित, विमा संरक्षित असून त्यावर तारण कर्ज राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका व बाजार समितीमार्फत सहज उपलब्ध होते. याचा शेतकरी व व्यापाऱ्यांनी नक्कीच लाभ घ्यावा, असे आवाहन धनंजयराव गाडगीळ संस्थेच्या संचालिका सौ. सीमा मिश्रा यांनी केले. त्या ता. 16 बुधवारला सकाळी 11.30 वाजता सिंदी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सेलू येथील उपबाजारपेठ आयोजित जागरूकता कार्यक्रमात त्या बोलत होत्या.