सुविधा

शेतकऱ्यांना रु.५/- मध्ये भोजन व्यवस्था योजना

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दि. १९/११/२०१६ च्या ठराव क्र.०९ नुसार श्री. साई समाधान कॅटर्स, सेलू यांनाझुनका भाकर केंद्र चालविण्याची परवानगी देण्यात आली व शेतकऱ्यांना समितीच्या मार्केट यार्डमध्ये शेतमाल विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्यांना रु.०५/- मध्येझुनका भाकरीचे भोजन देण्यात येते त्या पैकी यायोजनेकरीता बाजार समिती प्रत्येकी रु.०५/- व अडते यांचे रु.०५/- असा सहभाग राहील असे ठरविण्यात आले. सदर योजना बाजार समितीने चांगला उपक्रम राबविला असून तालुक्यातील मार्केट यार्डमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना भोजन व्यवस्था करून त्यांचे हित जोपासणारी आहे.